Solapur News : सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही : चंद्रशेखर बावनकुळे

Solapur News : दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडूनऑफर होती, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे  यांनी केला. अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी इथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी हे वक्तव्य केलंय मात्र सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी   केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,  मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की,  भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेला ऑफर दिली नाही.  भेटी होणे ही वेगळी गोष्ट आहे मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. आमच्य पक्षाला तशी गरज नाही, पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे. आम्ही कुणालाही आमदारकी, खासदारकीसाठी पक्षात या असं म्हणणार नाही. परंतु  मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार.

Pandharpur News : विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील जातीयतेची उतरंड मांडणारी आरती बंद करा : डाॅ. भारत पाटणकर

पुढील  काळात उद्धव ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाही : चंद्रशेखर बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, संजय राऊत, उद्धव ठाकरे अनेक सभांमध्ये बोलले होते  मोदीजीअखंड भारत करू शकतात. ज्या काँग्रेस पार्टीने रामाला, रामसेतूनला काल्पनिक म्हटलं आहे अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे आहेत.  पुढील  काळात उद्धव ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाही. 

चर्चेतून जागावाटप निश्चित होईल : चंद्रशेखर बावनकुळे

जागावाटपाविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दिल्लतून सोलापूरच्या खासदारकीचा उमेदवार ठरवण्यात येईल. राज्य ठरवत नाही अजित पवार, देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे  एकत्र बसून कोणला कोणती जागा  द्यायची हे ठरवतील आणि मग केंद्रीय बोर्ड ठरवेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply