Solapur Crime News : दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या दोघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. नातेपुते-फोंडशिरस रस्त्यावरील महादेव मंदिरजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नारायण विठ्ठल जाधव (वय ४२) आणि दुर्योधन नवनाथ निकम (वय २२) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोघेही दहिगाव, चिकणे वस्ती येथील रहिवासी आहेत. या हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.

Sangali News : सांगली, पुण्यासह ५ रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; संशयित आरोपीला मुंबईतून अटक

किरकोळ कारणातून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नारायण जाधव याला दारूच्या नशेत आरोपींनी मारहाण केली होती. या मारहाणाची जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन हे आरोपींकडे गेले होते.

यादरम्यान, त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला, की आरोपींनी नारायण आणि दुर्योधन याच्यावर दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले.

स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply