Solapur  : अजित पवारांनी इशारा देऊनही मोहोळमध्ये दोन पाटलांचा संघर्ष सुरूच

Solapur  : राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना आणि सध्या अजित पवार यांचा दुसरा गट अस्तित्वात असताना या पक्षात मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते राजन पाटील-अनगरकर आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळमध्ये आले असताना, त्याच मुहूर्तावर राजन पाटील यांच्या विरोधात मोहोळ बंद पुकारण्यात आला. त्यामुळे अखेर अजित पवार यांना उमेश पाटील यांच्या उपद्रवाची दखल घ्यावी लागली.

मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असताना त्यांच्यातील गटबाजी सुरूच आहे. राष्ट्रवादी एकसंघ असताना शरद पवार यांच्यासमोर आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गट अस्तित्वात असताना खुद्द अजित पवार यांच्यासमोर ही गटबाजी वेळोवेळी पहावयास मिळाली आहे.

Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

परंतु पवार काका-पुतण्याने या गटबाजीकडे कानाडोळाच केला. या पार्श्वभूमीवर अलीकडे राजन पाटील यांच्या गावात, अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय झाले आहे. या अप्पर तहसील कार्यालयास त्यांच्या विरोधकांची गावे जोडली गेल्यामुळे सर्व विरोधक नवीन अप्पर महसूल कार्यालय मंजुरीच्या विरोधात एकवटले आहेत. या प्रश्नावर उमेश पाटील यांच्या गुणाकारांनी सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळमध्ये आले असताना नेमका तोच मुहूर्त साधून मोहोळ तालुका बचाव समितीने मोहोळ बंद पुकारला होता. तसेच अजित पवार यांचा दौरा रद्द होणार असल्याची आवई उठवण्यात आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply