उद्योजक यायला तयार, पण जागा मिळेना! सोलापूर, अक्कलकोट रोड एमआयडीसीतील 176 बंद उद्योगांना नोटीस; 8000 एकराच्या भूसंपादनाचा निर्णय प्रलंबितच

Solapur : पुणे-मुंबईसह सोलापूरमधील ३३ उद्योजकांनी उद्योग सुरू करण्यासाठी सोलापूरमधील एमजायडीसीमध्ये जागेची मागणी केली आहे. परंतु, अजूनही त्यांना जागा मिळालेली नाही. नवीन जमिनीच्या भूसंपादनाचा विषय प्रलंबित असून दुसरीकडे अनेकांनी नुसत्या जागा घेऊन ठेवल्या पण उद्योग सुरू केलेले नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दीडशेहून अधिक उद्योजकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनेक मोठमोठे उद्योग परराज्यात गेले असून अजूनही अनेकजण त्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. उद्योजकांसाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा असलेल्या ठिकाणी त्यांना पुरेशा प्रमाणात जमीन मिळत नाही, याशिवाय टॅक्स व अन्य अडचणी त्यासाठी कारणीभूत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एक लाखांहून अधिक तरुणांना जिल्ह्यातील विविध एमआयडीसींमध्ये नोकरी तथा रोजगार मिळेल, अशी स्थिती आहे. पण, त्यासाठी चिंचोळी (ता. मोहोळ), कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर), मोडनिंब (ता. माढा), कासेगाव (ता. पंढरपूर), गौडगाव टप्पा दोन (ता. बार्शी) व गारवाड (ता. माळशिरस) येथील एमआयडीसीमध्ये आठ हजार एकर (३२०० हेक्टर) जमीन आवश्यक आहे. राज्य शासनाच्या उद्योग विभागाला त्यासंबंधीचे प्रस्ताव गेले आहेत, पण अजूनही त्या जमिनीचे संपादन सुरू झालेले नाही. आगामी काळात त्यावर निर्णय न झाल्यास हे उद्योजक दुसरीकडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Mumbai News : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलने संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घटना

१७६ बंद उद्योजकांना नोटीस

ज्या उद्योजकांनी एमआयडीसींमध्ये उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने जागा घेतल्या, पण अनेक वर्षे होऊनही उद्योग सुरू केले नाहीत किंवा बंद उद्योग पुन्हा सुरूच केले नाहीत. अशा छोटे उद्योग (३ महिने) ते मध्यम उद्योग (६ महिने) व मोठ्या उद्योगांना (९ महिने) ती जागा दुसन्याला पोटभाड्याने द्यावी, दुसन्या उद्योजकांना हस्तातर करावी, अशा नोटीसा बजावल्या आहेत. त्यानुसार चिंचोळी एमआयडीसीतील १३८ तर अक्कलकोट रोड एमआयडीसीतील ३८. उद्योजकाना नोटिसा देण्यात आल्या आहेत

जिल्ह्यातील एमआयडीसीची सद्य:स्थिती

• एमआयडीसी भूसंपादनाचा प्रस्ताव

• चिंचोळी १५१.३२ हेक्टर

• कुंभारी ९४६ हेक्टर

• मोडनिब ३७.६६ हेक्टर

• कासेगाव २१.१५ हेक्टर

• गौडगाव ८२.७० हेक्टर

• गारवाड २७५४.५२ हेक्टर

एकूण ३१९३.७१ हेक्टर

३३ उद्योजकांना हवीय ११५ एकर जमीन

सोलापूर जिल्ह्यातील चिंचोळी, मंगळवेढा, बार्शी, टेंभुर्णी, करमाळा या एमआयडीसीत ३३ उद्योजकांनी जागा मागितली आहे. या एमआयडीसीतील नव्या उद्योजकांसाठी व सध्याच्या काही उद्योजकांना त्यांचा उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी जमिनी हव्या आहेत. पण, त्यावर भूखंड वाटप समितीकडून निर्णय झालेला नाही. चिंचोळी एमआयडीसीसाठी आणखी १५१.३२ हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु, त्यावर अनेक महिन्यांपासून निर्णय झालेला नाही. दुसरीकडे होटगी रोडवरील लॉजिस्टिक पार्कचा विषयही प्रलंबितच आहे.

सत्ताधारी ११ आमदार, तरीही सरकार दरबारी उपेक्षाच

जिल्ह्यातील 'शहर मध्य' हा एकमेव विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित दहा मतदारसंघासह एक विधान परिषदेचे असे एकूण ११ आमदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. विद्यमान आमदारामध्येच दोन माजी मंत्रीही आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातून रोजगार तथा उदरनिर्वाहासाठी सुशिक्षित तरुणासह अनेकजण स्थलांतर करत आहेत. सोलापुरात उद्योजक यायला तयार आहेत, पण एमआयडीसीमध्ये पुरेशी जागा मिळत नाही, अशीही वस्तुस्थिती आहे त्यावर लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडतोय असे बोलले जात आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply