Sindhudurg : सिंधुदुर्ग हादरला, झुडपात सापडली गूढ कार, नंबरप्लेट गायब – आत पाहून पोलिसही गोंधळले

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीच काही गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं उघडकीस आली होती. त्यात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोडामार्ग पोलिसांना तिलारी धरणाच्या मुख्य पुलाजवळ रक्ताने माखलेली एक बेवारस कार सापडली आहे. विशेष म्हणजे, या कारची नंबरप्लेटही गायब आहे. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात, असा प्रश्न उपस्थित झाला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गुरुवारी (24 ऑक्टोबर) सकाळी काही स्थानिक नागरिकांना धरणाच्या मुख्य पुलाजवळ झुडपांमध्ये उभी असलेली ही संशयास्पद कार दिसून आली. इतक्या दुर्गम आणि अडचणीच्या ठिकाणी ही कार कशी पोहोचली, याबाबत स्थानिकांना संशय आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

Satara : धक्कादायक! साताऱ्यात महिला डॉक्टरवर दोन पोलिसांकडून बलात्कार; मृत्यूपूर्वी हातावर लिहिली सुसाईड नोट, परिसरात खळबळ

दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता, कारच्या आत आणि बाहेर सर्वत्र रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे या घटनेचं गूढ अधिकच गहिरं झालं आहे. पोलिसांनी तातडीने ही कार ताब्यात घेतली असून, नंबरप्लेट गायब असल्याने वाहनाच्या मालकाचा शोध चेसिस नंबरवरून सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात ही कार आंध्र प्रदेश नोंदणीची असल्याचं पोलिसांना समजलं आहे. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणे, घटनास्थळावरील पुरावे गोळा करणे आणि स्थानिक चौकशी सुरू केली आहे.

या घटनेमागे एखादा गंभीर गुन्हा दडलेला असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात असून, दोडामार्ग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *