Sindhudurg Crime News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर 30 लाखाची दारू जप्त, वाहन चालक फरार

Sindhudurg Crime News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदूर्ग जिल्ह्यात बेकायदा दारू वाहतुकीवर अबकारी खात्याकडून माेठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर विविध खात्यांकडून गोव्यातून महाराष्ट्र किंवा अन्य राज्यात जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने माेठी कारवाई केली.

Ashok Chavan : नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; अशोक चव्हाणांना घेराव, गावात येण्यास मज्जाव

गोवा अबकारी खात्याच्या भरारी पथकाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पत्रादेवी येथील तपासणी नाक्यावर गोव्यातून आंध्रप्रदेश मध्ये होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई केली.

या कारवाईत ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काळोखाचा फायदा घेत वाहन चालक फरारी होण्यात यशस्वी झाला. दरम्यान भरारी पथकाने ३० लाख रुपये किमतीची दारू आणि १२ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला आहे.

ही कारवाई निरीक्षक राजेश नाईक, जयेश बांदेकर, उपनिरिक्षक वासुदेव गवस, विशाल गवस, जितेंद्र गवस, लाडू गावकर, तुकाराम जंगले यांच्या पथकाने केली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply