Sindhudurg Boat Accident : वेंगुर्ले बंदरात बोट उलटून मोठी दुर्घटना! चारही खलाश्यांचे मृतदेह सापडले; शोधमोहिम थांबली

Sindhudurg Boat Accident : सिंधुदुर्ग येथील  वेंगुर्ले बंदरात खलाश्यांना घेऊन जाणारी बोट पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत बोटमध्ये असलेले चारही खलाशी बुडाले होते. कालपासून या खलाश्यांचा शोध सुरू होता. आज अखेर या चारही खलाश्यांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला बंदरात बोट उलटल्याची मोठी दुर्घटना घडली होती. वेंगुर्ला बंदर येथून माश्यांचा बर्फ वगैरे घेऊन एकूण ७ खलाशी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मोठ्या बोटीच्या दिशेने निघाले होते. यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि उधाणामुळे बोटीने आपला मार्ग बदलला व ती भरकटली. त्या बोटीवरील सात खलाशी यावेळी समुद्रात फेकले गेले.

Pune : शेड काढले, पुन्हा उभे केले; कारवाईला न जुमानणाऱ्या १२ हॉटेलांवर गुन्हे दाखल

या दुर्घटनेत सात खलाशी समुद्रात कोसळले होते. त्यामधील तिघांनी पोहत समुद्र किनारा गाठला होता तर आणखी चार खलाशी बेपत्ता झाले होते. कालपासून या चारही बेपत्ता खलाश्यांचा शोध सुरू होता. यापैकी काल दोन जणांचे मृतदेह हाती लागले तर आज सकाळी आणखी दोघांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

दरम्यान, बोट बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये तीन मध्यप्रदेशमधील तर एक रत्नागिरीमधील खलाशी होता. आझाद मुनीलाल कोल, चांद गुलाल महमद, शिवराम कोल अशी मध्यप्रदेशमधील मृतांची नावे आहेत तर महादेव शंकर आंबेरकर हा रत्नागिरीमधील खलाशी आहे. प्रवरा नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच समोर आलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply