Sikkim Avalanche : भीषण घटना! हिमस्खलनात ६ पर्यटक ठार, ८० हून अधिक लोक अडकल्याची भीती

Sikkim Avalanche News : सिक्कीममधील नाथूला सीमावर्ती भागात आज (मंगळवार) मोठा हिमस्खलन झाला. या घटनेत ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जवळपास ८० पर्यटक अडकल्याची भीती आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हिमस्खलनानंतर गंगटोक ते नाथू ला जोडणाऱ्या १५ व्या मैल जवाहरलाल नेहरू मार्गावर बचावकार्य सुरू आहे. बर्फात अडकलेल्या २२ पर्यटकांची सुटका करण्यात आली. त्यांना गंगटोक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

तसेच रस्ता मोकळा केल्यानंतर अडकलेल्या ३५० पर्यटकांची आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली. भारत-चीन सीमेजवळील नाथू ला या उंच पर्वतीय खिंडीजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाला. हिल पास समुद्रसपाटीपासून ४,३१० मीटर (१४,१४०फूट) उंचीवर आहे आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply