Shraddha Walker case : श्रद्धा हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांना शरीराचे १३ तुकडे सापडले, तिचं शीर एका तलावात श्रद्धाचे शीर असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Shraddha Walker case : श्रद्धा वालकर हत्याकांड संदर्भात पोलिसांचा शोध जलद गतीने सुरू आहे. रोज या प्रकरणात नविन खुलासे होत आहेत. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष वेधले आहे. अशात आता या प्रकरणी आणखीन एक नवीन अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी एका तलावात श्रद्धाचे शीर असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे रविवारी पोलिसांचे एक पथक तलावाजवळ दाखल झाले आहे.

शरीराचे १३ तुकडे शोधण्यात पोलिसांना यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत श्रद्धाच्या शरीराचे १३ तुकडे सापडे आहेत. हे सर्व तुकडे अफताबने वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. त्यामुळे ते शोधण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे. अशात काही तुकडे जंगलात फेकल्याने हिंस्र प्राण्यांनी ते खाल्ले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी अफताबची वारंवार चौकशी करून हे तुकडे शोधले आहेत. मात्र त्याने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करण्यासाठी वापरलेले हत्यार अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. यासाठी त्यांनी अनेक दुकानांमध्ये चौकशी केली आहे.

रविवारी पोलीस पुन्हा एकदा मेहरौली येथील अफताबच्या घरी गेले. इथे त्यांनी झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा सिन रिक्रीएट करत तपास केला. यात सुरूवातीला त्या दोघांमध्ये नेमके काय झाले. अफताबने तिची हत्या कशी केली. शरीराचे तुकडे कसे केले. तसेच त्यांची विल्हेवाट कशी लावण्यात आली हा सर्व घटना क्रम पुन्हा एकदा तयार केला. यातून पोलिसांना पुढील तपासात बरीच मदत होत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *