Shocking News in Mumbai : घरात अख्खं कुटुंब झोपलं होतं, मध्यरात्री मुलीनं ७ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं आयुष्य

Shocking News in Mumbai : मुंबईत एका अल्पवयीन मुलीनं सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलीय. श्रेयसी असं मुलीचं नाव असून, ती १५ वर्षांची होती. ही मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. घरातील सदस्य झोपलेले असताना, ती आपल्या खोलीत अभ्यास करीत होती. पण अचानक इमारतीमधून मोठ्याने ओरडण्याच्या आवाजाने कुटुंब जागे झाले. तेव्हा मुलीनं सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. तिने आत्महत्या का केली? हे अद्याप निष्पन्न झालं नसून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मुंबईच्या मुलुंड पश्चिम परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका १५ वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. मुलुंड पश्चिम येथील एसीसी रोडवर असलेल्या १३ स्टोरेज भीम ज्योती इमारतीवरून तिनं उडी घेत आपलं आयुष्य संपवलं असून, मध्यरात्रीच्या सुमारास तिनं आत्महत्या केल्याची माहिती आहे.

Pimpri Chinchwad Police : वर्षभरात ३३ घुसखोरांना घेतले ताब्यात; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

मध्यरात्री कुटुंबातील इतर सदस्य झोपले होते. तेव्हा ती तिच्या खोलीत अभ्यास करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जोरात आवाज आला. हा आवाज एकूण कुटुंबातील सदस्य जागे झाले. नेमका हा आवाज कुणाचा होता? हे पाहण्यासाठी कुटुंबिय पाहण्यासाठी गेले असता, त्यांना मुलीनं सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केले असल्याचं दिसलं. मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून कुटुंबाला धक्काच बसला.

हे प्रकरण घडल्यानंतर तातडीनं तिला खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास करण्यास सुरूवात केली असून, अद्याप सुसाईड नोट किंवा आत्महत्या करण्यामागचं कारण समोर आलेलं नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply