Shocking News : आईच्या कुशीत झोपलेल्या ११ महिन्यांच्या बाळावर बिबट्याची झडप, दौंडमध्ये भीतीचे वातावरण

Shocking News : आईच्या कुशीमध्ये झोपलेल्या बाळावर बिबट्याने झडप टाकली आणि त्याला पळवून नेल्याची धक्कादायक घटना पुण्याजवळ घडली आहे. मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासोबत झोपली होती. महिलेच्या कुशीत झोपलेल्या ११ महिन्याच्या बाळाला बिबट्याने पळवून नेले. पुण्यातील दौंड तालुक्यातील दहिटणे येथे ही घटना घडली. या घटनेनंतर रडून रडून महिलेचे बेहाल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील दहिटणे येथील एका शेतामध्ये ही घटना घडली आहे. धुळा बोलू भिसे हे आपली पत्नी आणि ११ महिन्यांचा मुलासोबत मेंढ्यांच्या कळपाजवळ झोपले होते. ते झोपलेल्या ठिकाणाजवळ उसाच्या शेतात बिबट्या दबा धरून बसला होता. या बिबट्याने मध्यरात्रई आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला उसाच्या शेतात पळवून नेले.

IPS Deven Bharti : देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

डोळ्यासमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन जात असल्याचे पाहून देखील आई-वडील काही करू शकले नाही. बाळाच्या आई-वडिलांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्या बाळाला घेऊन पसार झाला. या घटनेची माहिती दौंड वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर पुणे येथील रेस्क्यू टीम, दौंड वन विभागाचे वनसंरक्षक दीपक पवार, दोडक वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे आणि यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बाळाचा शोध घेण्यासाठी त्यांनी शोधमोहिम राबवली. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत बाळाचा शोध घेण्यात आला पण बाळ कुठेच सापडले नाही. याठिकाणी उसाचे मोठे क्षेत्र असल्यामुळे बाळाचा शोध लागू शकला नाही. बाळ सापडले नसल्यामुळे आई-वडिलांनी हांबरडा फोडला. दरम्यान, बोरीपारधी गावच्या हद्दीत १७ नोव्हेंबर २०२४ रोजी भरदिवसा ऊसतोड मजुराच्या ३ महिन्यांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करीत त्याला ठार केले होते. पाच महिन्यांत तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply