Shocking News : भाजप आमदाराच्या ऑफिसमध्ये पिस्तुल, घातपाताचा डाव? VIDEO

image

छत्रपती संभाजीनगर येथे भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयामध्ये पिस्तुल आढळले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आमदार केनेकर यांच्या कार्यालयात एका व्यक्तीने ही बॅग ठेवली होती. त्याच बॅगेत हे पिस्तुल सापडले आहे. काल, शुक्रवारी एक व्यक्ती संजय केनेकर यांना भेटण्यासाठी आली होती. त्याच्यासोबत ही बॅग होती. या बॅगेतच पिस्तुल आढळले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विविध अंगाने तपास सुरू केला आहे. ही बॅग कुणाची आणि ते पिस्तुल नेमके कोणाचे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहे. तपास करून याबाबतची माहिती देऊ. ती कोणी आणि का आणली, त्यामागचा उद्देश काय? याचा तपास करू. सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील. त्याआधारे ओळख पटवून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत स्वतः संजय केनेकर यांनीही प्रतिक्रिया दिली, खरं तर सर्व जाती-धर्माचे लोक माझ्या कार्यालयात समस्या घेऊन येत असतात. निश्चितपणे गर्दी असते. कोण ठेवून गेलं हे माहीत नाही. मी ३८ वर्षांपासून भाजपचे काम करतो. प्रखरपणे भूमिका मांडण्याचं काम मी करतो. बऱ्याचदा धमक्या आल्या. मी भीक घालणार नाही. कुणीतरी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असेल. ही बॅग त्यासाठी ठेवली असेल. मी घाबरत नाही. माझं सरकार सक्षम आहे. काल संध्याकाळी सात वाजता पीएने फोन केला. कुणीतरी बॅग विसरले आहे, असे त्याने सांगितले. ही बॅग कुणीतरी विसरून गेला असेल, कार्यालयात ठेवून दे. उद्या बघूया असं मी त्याला सांगितलं. सकाळी कर्मचाऱ्यांनी ही बॅग तपासली. त्यात पिस्तुल सापडलं, अशी माहिती केनेकर यांनी दिली. याबाबत मी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *