Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं

Shocking Crime : नागपूरनंतर आता अकोल्यातही माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोट फैल भागातील अण्णाभाऊ साठे नगर येथे एका ५० वर्षीय नराधमाने गोठ्यात बांधलेल्या जनावरांसोबत अश्लील आणि अमानवी कृत्य केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही धक्कादायक घटना अकोल्यातील अकोट फैल भागातील अण्णाभाऊ साठे नगर येथे घडली. आरोपीचे नाव सुभाष काशीराम श्रीवास (वय ५०) असे असून, त्याने पाळीव जनावरांसोबत अत्यंत विकृत आणि गैरकृत्य केलं आहे. आरोपीने गोठ्यात बांधलेल्या जनावरांसोबत अश्लील कृत्य केलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार

संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर बजरंग दलाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आकोट फैल पोलिसांनी त्वरीत तपास सुरू करत आरोपी सुभाष श्रीवास याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं.

पोलीस तपास सुरु

हा व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी पसार झाला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे व्हिडिओ फॉरवर्ड न करण्याचं आवाहन करत, तपासात सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply