Shocking Crime : पुणे हादरलं! भरदुपारी ११ वर्षीय मुलीचं अपहरण, लॉजवर बलात्कार

Shocking Crime : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एका बलात्काराच्या घटनेमुळे पुणे हादरलं आहे. एका ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील वारजे भागात घडली आहे. मुलगी भरदुपारी दुकानात गेली. नंतर दोघांनी मुलीचे अपहरण करून तिला लॉजवर नेत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं घडलं काय?

२१ मार्चला दोन आरोपींना पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. राहुल विनोदकुमार गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश अशोक डोमपल्ले असे आरोपींचे नाव आहे.

Nashik Fraud Case : कांदा खरेदी करत व्यापाऱ्याची साडेसात लाख रुपयात फसवणूक; मनमाड बाजार समितीतील प्रकार

दुपारी साडेबाराच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी दुकानात निघाली होती. यावेळी दोघे आरोपी दुचारीवरून आले. नंतर दोघांनी मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. त्यानंतर लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार करत असतानाच राहुल गौतम या आरोपीने मुलीला धमकी दिली. 'तु माझ्याशी विवाह कर नाहीतर तुला मारून टाकेन' अशी धमकी दिली.

या घटनेची माहिती पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या आई वडिलांना दिली. त्यांनी पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपींसह लॉजचे मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा व्यवस्थापक टिकाराम चपाघई यांच्यावरही गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ जणांना अटक केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply