Shivsena News : शिवसेना कोणाची? ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार? राज्यातील सत्तासंघर्षावर उद्यापासून महत्त्वाची सुनावणी

Shivsena News : राज्यातील राजकारणासाठी महत्वाची असणारी सुनवणी उद्यापासून सुरु होत आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता पक्ष आणि पक्षचिन्ह नेमकं कुणाचं असा पेच निर्माण झाला होता. याप्रकरणी उद्या म्हणजे 12 डिसेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होणार आहे. 

शिवसेना कोणाची? शिवसेनेचं निवडणूक चिन्हं ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार? याबाबतच्या निर्णयासाठी उद्यापासून महत्वाची सुनावणी सुर होत आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगात युक्तीवाद होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगात उद्या शिंदे गट आणि ठाकरे गट युक्तीवाद करणार आहे. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर आता प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे.

गेले दोन महिने दोन्ही बाजूंनी लाखो कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहेत. या कागदपत्रांची पडताळणी करुन चिन्ह गोठवल्यानंतर आता आयोगाचा अंतिम निर्णय काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी 9 नोव्हेंबरची मुदत दिली होती. दोन्ही गटांना आपापले कागदपत्र निवडणूक आयोगसमोर सादर केली आहेत.

या प्रकरणाची ठाकरे गटाची याचिका 15 नोव्हेंबरला दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली होती. तसेच या वादावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply