Shiv sena Mla Disqualification : राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Shiv sena Mla Disqualification : शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या. जून २०२२ मध्ये प्रतिस्पर्धी गट उदयास आले तेव्हा त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत (आमदारांचे बहुमत) असल्याच्या आधारावर शिंदे गट हीच 'खरी' शिवसेना असल्याचे विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

शिंदे यांनी नियुक्त केलेल्या व्हिपलाही राहुल नार्वेकर यांनी अधिकृत व्हिप म्हणून मान्यता दिली. शिवसेना पक्षाचे आणि शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीपचे कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. या निकालाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

Mohan Bhagwat : 'राममंदिर झालं आता रामराज्यही आणा; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन, म्हणाले...

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली.

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) आमदारांना दहाव्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला होता. यावर शिवसेना उद्धव ठाकरे दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार २२ जानेवारी) नोटीस बजावली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply