
Shinde Group at Shiv Sena Vidhan Sabha Office : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट अधिकच आक्रमक झाला आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, शिवसेनेचा ताबा शिंदेंकडे गेल्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शाखा तसेच कार्यालये ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.
आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदारांनी विधिमंडळात प्रवेश केला. आणि त्याठिकाणी असलेले शिवसेनेचं कार्यालय आपल्या ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेनेचं विधानभवनातील कार्यालय सुद्धा गेलं आहे. दरम्यान, विधीमंडळ कार्यालयापाठोपाठ मंत्रालयासमोरील शिवालय कार्यालय सुद्धा शिंदे गट आपल्या ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर येणार?
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे-ऑर्डर आणण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर तातडीने स्टे-ऑर्डर आणण्यासाठी ठाकरे गट आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील याबाबत सावध भूमिका घेतली असून ठाकरे गटाने याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहेत.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती शिंदे गटाच्या वतीने या ‘कॅव्हेट’द्वारे करण्यात केली आहे. ठाकरे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.
यामुळेच शिंदे गटातर्फे शनिवारी रात्रीच ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने दाखल केली, तर त्यावर आमची बाजू ऐकून न घेता सुनावणी घेऊन कोणताही आदेश जारी करू नये, असे यात म्हटले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

