Shiv Jayanti News: शिवप्रेमींची न्यायालयामध्ये धाव; पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Ajinkya Devgiri Pratishthan : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आग्रा किल्ला परिसरात कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. आग्र्यामध्ये लाल किल्ला परिसरात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे हायकोर्टात धाव घेण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवजयंतीनिमित्त आग्रा किल्ला परिसरात कार्यक्रम घेण्यासाठी पुरातत्व खात्याने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना या आधी आग्रा किल्ला परिसरात परवानगी देण्यात आली आहे. तर मग शिवजयंती बाबत भेदभाव का? असा सवाल अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे विचारण्यात येत आहे.

आग्र्यामध्येच छत्रपती शिवरायांना औरंगजेबाकडून कैद करण्यात आलं होतं. यातून त्यांची सुटका व्हावी यासाठी मोठी युक्त लढवण्यात आली. औरंगजेबाच्या तावडीतून महाराजांची ऐतिहासिक सुटका झाली. त्यामुळे याच पराक्रमी घटनेला उजळणी देण्यासाठी शिवप्रेमींनी आग्र्यात शिवजयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते.

परवानगीसाठी मुख्यमंत्र्यांनी देखील पत्र दिले. मुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्र्यांच्या पत्रानंतरही पुरातत्त्व खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद येत नसल्याने प्रकरण अखेर कोर्टात गेले आहे. याआधी अदनान सामी आणि इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आग्र्याच्या किल्ला परिसरात झाले आहेत. असा दावा करत देवगिरी प्रतिष्ठानतर्फे दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हायकोर्टात नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply