Shirur : दुर्देवी घटना! मामाच्या गावी आलेल्या भावंडांवर काळाची झडप; शेततळ्यात बुडून सख्या भावांचा मृत्यू

Shirur : उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या दोन सख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पाबळ येथे घडली. आर्यन संतोष नवले (वय १३) आणि आयुष संतोष नवले (वय १०) अशी मृत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाबळ येथे राहणारे सचिन जाधव यांचे भाचे उन्हाळी सुट्टीत मामाच्या गावी आले होते. बुधवारी (ता. २२) दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन्ही भाऊ आजोबांसोबत शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले.

Ujani Boat Accident : उजनी धरणात बुडालेल्या ६ पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले; पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू

उन्हाचा तडाखा प्रचंड असल्याने दोन्ही भावंडांनी आजोबाची नजर चुकवली. जवळच असलेल्या शेततळ्यामध्ये ते पोहण्यासाठी गेले. दोघांनी कपडे काढून पाण्यामध्ये उड्या मारल्या. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

मुले कुठेही दिसून न आल्यामुळे आजोबाने त्यांचा शोध घेतला. शेततळ्यावर जाऊन पाहिले असता, दोन्ही मुले पाण्यात बुडालेली दिसून आली. आरडाओरड झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दोघांनाही पाण्याबाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. याबाबत मुलांचे मामा सचिन बाळासाहेब जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply