Shirur News : बैलगाडा घाटात कौटुंबीक वाद, तुफान हाणामारीत तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Shirur News : पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये  धक्कादायक घटना घडली आहे. बैलगाडा घाटामध्ये तुफान राडा झाला असून हाणामारीमध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. बैलगाडी शर्यतीदरम्यान ही घटना घडली आहे. कौटुंबीक वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील शिंदेवाडीमध्ये आज यात्रा आहे. यात्रेनिमित्ताने गावामध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीमध्येच दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. दोन कुटुंबातील हा वाद आहे. बैलगाडा शर्यतीदरम्यान दोन्ही कुटुंबातील काही सदस्य आमने-सामने आले. एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला काठीने बेदम माराहण केली.

Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ४ ठार, १० जण जखमी

मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. हाणामारी करणारी ही दोन्ही कुटुंब शिंदेवाडी येथीलच आहेत. या दोन्ही कुटुंबातील भांडणाचे कारण अद्याप समोर आले नाही.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply