Shirur Lok Sabha : शिरूरमध्ये प्रचारावरून वातावरण तापलं; अमोल कोल्हेंचा हल्ला, तर आढळरावांचा प्रतिहल्ला

Shirur Lok Sabha : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. आता प्रचारामध्ये उमेदवार एकमेकांवर वार-पलटवार करत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील अमोल कोल्हे विरूद्ध शिवाजी आढळराव पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राज्यात आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आलं आहे.

शिरूर लोकसभा  मतदारसंघात  प्रचारावेळी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंची अनेक गावांत पंचायत केली जात आहे. हे कार्यकर्ते अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पेरत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे, असं म्हणत कोल्हेनी आढळरावांकडे बोट दाखवलं. तर अशी नाटकं करण्यात कोल्हे पटाईत आहेत, असं सांगत आढळरावांनी पलटवार  केलाय.

Sangli Constituency : प्रकाश शेंडगे यांच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक; रायकीय वर्तुळात खळबळ

खासदार झाल्यापासून कोल्हेंचा मतदारसंघात जनसंपर्क नाही. हा मुद्दा विरोधकांकडून प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलाय. त्यामुळं काही गावांमध्ये गावकरी कोल्हेना घेरत आहेत. पाच वर्षे कुठं गायब होता? खासदार म्हणून आमच्यासाठी काय केलं? आता आमच्या गावात कशाला येताय? आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या? अशा रोषाला अमोल कोल्हेंना सामोरं जावं लागत आहे.

तर काही ठिकाणी कोल्हे दिसताच मोदी-मोदी अशी घोषणाबाजीही झाली  आहे. आढळराव त्यांचे कार्यकर्ते गावागावात पेरत आहेत. त्यांच्याकडून असा उपद्याप केला जातोय, अन त्याचे व्हिडीओ बनवून मतदारसंघात व्हायरल केले जात आहेत. आढळराव हा रडीचा डाव खेळत आहेत, असं कोल्हे म्हणालेत. मात्र , अशी नाटकं करायची सवय कोल्हेंना आहे. गेल्या लोकसभेत मुंबईमध्ये त्यांच्या सांगण्यावरून मला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यामुळं माणसं पेरायची सवय कोल्हेंची आहे, असा पलटवार आढळराव पाटलांनी केलाय.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply