Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अमोल कोल्हेंविरोधात कुणाला मिळणार उमेदवारी?

Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला असून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांना दिले आहेत. 

आज बुधवारी (ता. २०) अजित पवार शिरुर लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाला होणारा विरोध टाळण्यासाठी ते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे. त्याचबरोबर ते दिलीप मोहिते पाटील यांची देखील मनधरणी करणार आहेत.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का! सूर्या फिटनेस टेस्टमध्ये नापास, इतक्या सामन्यातून बाहेर

शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंचा पराभव करणार, असं अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे म्हटलं होत. मात्र, कोल्हेंविरोधात नेमकं निवडणुकीच्या रिंगणात कुणाला उतरवायचं असा प्रश्न अजित पवारांसमोर होता.

अशातच शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन निवडणुकीच्या उमेदवारी देण्याचं अजित पवारांनी ठरवलं. मात्र, आढळराव पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला.  

आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील २० वर्षाचा संघर्ष असल्याने त्यांचे काम करण्यापेक्षा मी राजकारण सोडून घरी बसेल, अशी ठाम भूमिका दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली. आता मोहिते पाटील यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार शिरुरमध्ये जाणार आहेत.

त्याचबरोबर आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत ते कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहे. यानंतर एक ते दोन दिवसांत शिरुर लोकसभेतून आढळराव पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असणार, अशी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply