Shirpur News : कारमधून गांजाची तस्करी; ५४ किलो गांजासह तिघांना अटक

Shirpur News : मुंबई- आग्रा महामार्गावरून अवैधरित्या गांजाची कारमधून वाहतूक केली जात होती. ही कार  महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असताना बिजासन घाटात सेंधवा (जि. बडवानी, मध्य प्रदेश) पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडवानी जिल्ह्यात आंतरराज्यीय नाक्यांवर ऑपरेशन प्रहारअंतर्गत तपासणी मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रातून  मध्य प्रदेशात गांजाची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पुनीत गेहलोद यांना मिळाली होती. त्यांनी  सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. महाराष्ट्रातून आलेल्या वाहनांची बिजासन येथे तपासणी सुरू झाली. त्यानुसार कार अडवून तपासणी केली असता तीन प्लॅस्टिक गोण्यांमध्ये भरलेला गांजा आढळला. त्याचे वजन ५४ किलो असून, किंमत दहा लाख ४० हजार रुपये आहे. कारसह एकूण १७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

Ahmednagar News : बायोगॅसने ५ जणांचा मृत्यू; मांजर अद्याप विहिरीतच, विखे पाटलांकडून मृतांच्या कुटुंबीयांची भेट

तिघांना अटक
गांजा तस्करी करताना आढळलेले कारमधील संशयित भय्यासिंह कलसिंह डावर (पावरा, वय २८), संदीप सीताराम डुडवे (१९, दोघे रा. निलगिरी पाडा, पळासनेर, ता. शिरपूर) व दिनेश दशरथ कनोजे (३४, रा. हिगाव, ता. शिरपूर) यांना अटक करण्यात आली. हे तिघेही शिरपूर तालुक्यातील रहिवाशी आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply