Shirpur Accident : मजुरांनी भरलेली गाडी उलटली; मुलीचा मृत्यू, १९ जखमी

Shirpur Accident : मजुरांनी भरलेला ट्रकचा टायर फुटल्याने भरधाव ट्रक पलटी झाला. यामुळे झालेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले आहेत. सदर अपघात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर घडला.

मुंबई- आग्रा महामार्गावरील  दभाशी (ता. शिंदखेडा) जवळ हा अपघात घडला. अपघातात जखमी झालेले मजूर मध्यप्रदेशातील कोलकी (जि. बडवानी) येथील रहिवाशी आहेत. मजुरीचा हंगाम आटोपून दीड महिन्यानंतर सर्वजण घराकडे निघाले होते. दरम्यान दभाशी फाट्याजवळ  पिकअपचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. यात बानाबाई रामदास पावरा (वय १५) या मुलीचा मृत्यू  झाला आहे. दरम्यान, महामार्ग पोलिसांच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

CM Eknath Shinde : सलमान खान गोळीबार प्रकरणी CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तीला सोडलं जाणार नाही

जखमींना रुग्णालयात केले दाखल अपघातात जखमींमध्ये साजन पावरा (वय १०), कविता पावरा (वय ६), सायना पावरा (वय १०), रेखा पावरा (वय ३०), रोशनी पावरा (वय १६), टिल्या पावरा (वय ७), रितीक पावरा (वय २४), भाईसिंह पावरा (वय २४), सपना पावरा (वय १५), सजनी पावरा (वय दीड वर्ष), पूजा पावरा (वय ३०), साजन पावरा (वय ४), पिंकी पावरा (वय ३५), ईचल्या पावरा, पार्वती पावरा, रेखाबाई पावरा, अश्‍विन पावरा (वय ४), रुमालसिंह पावरा, दिनेश पावरा (सर्व रा.कोलकी) यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल जैन व सहकाऱ्‍यांनी तातडीने उपचार केले. ९ गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply