Shirish kanekar No More : ज्येष्ठ लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन; वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shirish kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने शिरीष कणेकर यांचे निधन झालं आहे. कणेकर यांनी वयाच्या ८० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कणेकर यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शिरीष कणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. आज सकाळी कणेकर यांना प्रकृती खालावल्याने हिंदूजा रुग्णालयात दाखल केले होते. यादरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

शिरीष कणेकर यांनी चित्रपट, संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींवर विपुल लेखन केलं आहे. समाजकारण, राजकारण, साहित्य आणि संस्कृती या विषयांचीही कणेकर यांना आवड होती. त्यांनी या विषयावरही लेखन केलं आहे. कणेकर यांचे कणेकरी, माझी फिल्मबाजी नावाचे कार्यक्रम विशेष गाजले.

दरम्यान, शिरीष कणेकर यांना काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांकडून गौरविण्यात आले होते. त्यांना साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कणेकर यांनी आतापर्यंत ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहे. कणेकर यांचा वाचक वर्ग देखील खूप मोठा होता.

Ratnagiri Rain : जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी; खेड पुराच्या उंबरठ्यावर, अनेक दुकानं पाण्याखाली

शिरीष कणेकर यांच्याविषयी...

शिरीष कणेकर यांचं मूळ गाव हे रायगड जिल्ह्यातील पेण हे आहे. कणेकर यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. कणेकर यांचं भायखळ्यातील रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचं बालपण गेलं आहे. कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार होते. तसेच त्यांनी क्रीडा आणि मनोरंजन सृष्टीवरही लेखन केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply