Shevgaon Bandh News : शेवगाव बेमुदत बंद; पालकमंत्र्यांच्या आवाहानंतरही व्यापारी ठाम, आजही बाजारपेठेत सन्नाटा

Shevgaon Bandh News : शेवगाव शहरातील घटनेनंतर आजही व्यापारी संघटना गावातील दुकानं तसेच गाव बेमुदत बंद ठेवण्यावर ठाम राहिले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी चुकीचे वर्तन करणा-यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देत बंद मागे घ्यावा असे आवाहन साेमवारी (ता. 15) केले हाेते. परंतु आजही शहरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. 

नगर जिल्ह्यातील शेवगाव (shevgaon) शहरात साेमवारी रात्री दोन गटात वाद निर्माण झाला हाेता. त्यानंतर दगडफेक देखील झाली. या प्रकरणी पाेलिसांनी सुमारे 250 ते 300 जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतरपाेलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतले.या सर्वांना न्यायालयात हजर केले असताना त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे टील यांनी शेवगावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर व्यापा-यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी व्यापा-यांना बेमुदत बंद मागे घेण्याचे आवाहन केले हाेते.

आज (मंगळवार) व्यापारी संघटना बंदवर ठाम राहिले. साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी आम्ही दहशतीखाली आहाेत. आमचे माेठे नूकसान झाले आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे जाणवते. चुकीचे वर्तन करणा-यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply