Sharad Pawar : मोठी बातमी! पुढील २ दिवसात अंतिम निर्णय घेऊ, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar Resigns Update: शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आज याच कार्यकर्त्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला आहे. 'दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावा लागणार नाही', असं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.

कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले आहेत की, "जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला. उद्या पक्षाचं कामकाज असं चालावं, त्यातून नवीन नेतृत्व मजबूत करावं हा माझा हेतू होता, असे निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती, पण ती माझ्याकडून घेतली गेली नाही.''

पवार म्हणाले की, ''आता हा जो निर्णय घेतला त्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून जे लोक आले त्यांनी सांगू इच्छितो की, संध्याकाळी मी बैठक घेईल, त्यानंतर अंतिम निर्णय एक ते दोन दिवसात घेऊ. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही.''



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *