Sharad Pawar Resigns: ''तुम्ही थांबणार असाल तर आम्ही थांबतो'',शरद पवारांच्या निर्णयानंतर जयंत पाटलांना अश्रु अनावर

Sharad Pawar Resigns : शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडत आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावुक झाले. यावेळी बोलताना त्यांना अश्रु अनावर झाले.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की,' आम्ही तुमच्याकडे बघत मोठे झालो आहोत. आम्ही तुमच्याकडे बघून राजकारण शिकलो. तुम्ही हा निर्णय मागे घ्यावा. तुम्ही पुढेही आम्हाला पक्षाला हवे आहात. त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं. आजही आम्ही त्यांच्याकडे बघून राजकारणात आहोत. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाकरी फिरवण्याच वक्तव्यही केलं. तुमची जी प्रतिमा आहे ती इतर कोणालाही येणार नाही. आमचे राजीनामे घ्या ज्याच्या हातात हवं त्याच्या हातात पक्ष द्या. पण तुम्ही सोडून जावू नका. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही थांबतो. तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या अशी विनंती यावेळी जयंत पाटील यांनी केली आहे.

तर पुढे जयंत पाटील म्हणाले की "तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुणीच काम करु शकणार नाही, तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबतो, ज्याला हा पक्ष चालवायचाय, त्याला चालवू द्यावा, आम्हाला नको."

पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल यासाठी एक समिती नेमण्यात येणार असून समितीच्या निर्णयानुसार पुढचा अध्यक्ष ठरवण्यात येणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या" अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply