Sharad Pawar On PM Narendra Modi : बंडखोरीचे श्रेय पंतप्रधानांना द्यावं लागेल, शरद पवारांचा थेट मोदींवर निशाणा

Sharad Pawar Statement: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज मोठा राजकीय भूकंप केला. त्यांनी राष्ट्रवादीत बंड पुरकारत थेट शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि नेत्यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत.

आज राजभवनात अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर शरद पवारांनी थेट मोदींवर निशाणा साधला आहे.'या बंडखोरीचे श्रेय पंतप्रधानांना  द्यावं लागेल.', अशी टीका त्यांनी केली आहे.

शरद पवारांनी सांगितले की, 'दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक वक्तव्य केले होते. ते काँग्रेस पक्षाच्या विरोधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष असे त्यांनी सांगितले होते. हे सांगताना मोदींनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला होता आणि सिंचन विभागाबद्दल तक्रीर होती असाही उल्लेख केला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मला आनंद आहे की, आज मंत्री मंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ असा होतो की, त्यांनी जे आरोप केले होते ते वास्तव नव्हते.

Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

तसंच, 'राष्ट्रवादीवर केलेल्या या सगळ्या रोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते. त्या सगळ्यांना मुक्त केलं यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी आहे. भाजपमधून सातत्याने राष्ट्रवादी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे आजच्या बंडखोरीचं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावे लागेल.', असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

शरद पवारांनी पुढे सांगितले की, 'राष्ट्रवादी पक्षाची 6 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही. 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी काही नवीन नाही. त्यावेळी मला जे सोडून गेले होते ते नंतर पराभूत झाले होते.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply