Sharad Pawar on Belgaum : 'मी न्यू बेळगावचा प्रस्ताव मांडला', कर्नाटक निवडणुकीआधी शरद पवारांचा पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट

Sharad Pawar on Maharashtra-Karnataka Border Dispute : गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील सीमावाद सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी हा सीमावाद चांगलाच उफाळून आला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील ४० गावांवर दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, आगामी कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सीमावादाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शरद पवार यांचे लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले आहे. या पुस्तकात शरद पवारांनी अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातच शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्न सोडवण्यासाठी न्यू बेळगावचा प्रस्ताव मांडला होता अशी खळबळजनक माहिती दिली आहे. 

सीमावादाबाबत शरद पवारांनी काय म्हटलंय?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सीमावादाबाबत लिहतात, "सीमाप्रश्नाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र प्रश्न भिजत पडण्यापेक्षा त्यावर सर्वमान्य आणि किमान समाधानकारक तोडगा काढायला हवा"

पुढे त्यांनी लिहिलं की, "सीमावादावर एक तोडगा मी सुचवला होता. बेळगाव महाराष्ट्राला मिळायला हवं, ही आपली इच्छा होती आणि आहे. तिथल्या मराठी माणसालाही महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा आहे. त्या दृष्टीनं मी 'न्यू बेळगाव'चा प्रस्ताव मांडला होता", असे शरद पवारांनी लिहीलं आहे.

'मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला पूर्णविराम हवा'

शरद पवारांनी आपल्या पुस्तकात मुंबईबाबत देखील लिहलं आहे, "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेली ६३ वर्षं भिजत असतानाच मुंबई केंद्रशासित होणार असल्याची चर्चा तितकीच जुनी आहे. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम हवा", असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

"मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढावी, असं दिल्लीतल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही, हे मी जबाबदारीनं सांगू शकतो, असेही शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात लिहलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply