Sharad Pawar : राज ठाकरेंनी माझं नाव दोन-तीनदा का घेतलं कळत नाही, माझा कसला हातभार? शरद पवारांचा प्रतिप्रश्न

Pune  : महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी नेत्यांनी घेतली पाहिजे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, असं एकनाथ शिंदे यांना सुचवल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन तीन वेळा माझं नाव का घेतलं, कळत नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात किंवा जातीपातीच्या राजकारणात माझा हातभार असण्याचा प्रश्नच कुठे येतो? असा सवाल शरद पवारांनी विचारला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला, तसंच जातीचे राजकारण पसरवण्यात हातभार लावू नये, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते. याविषयी प्रतिक्रिया विचारली असता, शरद पवार म्हणाले की राज ठाकरे यांनी दोन तीन वेळा माझं नाव का घेतलं कळत नाही. महाराष्ट्र थोडा फार मलाही कळतो. मणिपूरचा प्रश्न वेगळा होता. हातभार लावायचा प्रश्न कुठे येतो, मी बोलतो त्यातून हातभार कसा लागतो? राज ठाकरेंनी माझं नाव विनाकारण घेतलं. मराठवाड्यात त्यांच्या गाडीवर हल्ला झाला, मीही मराठवाड्यात फिरलो, तिथे मलाही लोकांनी अडवलं, मला निवेदन दिलं, असं शरद पवार म्हणाले.

Mumbai Thief Death : कर्माची शिक्षा, चोरीसाठी मुंबईतील टोलेजंग इमारतीत शिरला, कसारा मर्डर केसच्या आरोपीचा असा झाला अंत

 

महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. दोन समाजात कटुता निर्माण होणार नाही, यासाठी पावलं टाकली पाहिजेत. यावर पर्याय काय, हा विषय आहे, माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांना योग्य वाटतील त्या व्यक्तींना निमंत्रित करावं, आणि आम्हीही उपस्थित राहू, आमची समन्वय, सहकार्याची भूमिका राहील. राजकीय पक्षातील नेते, विविध घटक, मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रित करावं. ओबीसींचं नेतृत्व करणाऱ्या छगन भुजबळ आणि अन्य नेत्यांनाही संयुक्त बैठकीस बोलवावं, असं शरद पवार यांनी सुचवल्याचं सांगितलं.
५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र ही मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. धनगर, लिंगायत, मुस्लीम आरक्षण याविषयीही भूमिका जरांगेंनी मांडली आहे, असं पवार म्हणाले.




राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply