Sharad Pawar : भाजपकडून सत्ता काढण्याची लोकांची भूमिका; शरद पवार यांचा दावा

Sharad Pawar : शरद पवार यानी मंगळवारी (ता. १८) बारामती तालुक्यातील निंबूत, करंजेपूल, वडगाव निंबाळकर, कोहाळे खुर्द आदी परिसरात दौरा केला. त्यावेळी करंजेपूल येथे राष्ट्र‌वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने झालेल्या शेतकरी जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जगन्नाथ शेवाळे होते. याप्रसंगी एस. एन. जगताप, सतीश खोमणे, प्रवीण गायकवाड, युगेंद्र पवार, बी. एम. गायकवाड, प्रवीण भोसले, प्रदीप कणसे, विलास शेडकर, बुवासाहेब हुबर, नुसरत इनामदार आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, "पंतप्रधान व त्यांच्या सहकाऱ्याऱ्यांपुढे आम्हा त्रयिचा टिकाव कसा लागेल, अशी लोकांना काळजी होती. पण तुमच्यासारख्या लाखो लोकानी चोख काम केले. आता जुने काही काढायचे नाही. जे येतील त्यांच्यासोबत आणि जे वेणार नाहीत. त्यांच्याशिवाय पुढे जायचे. महाराष्ट्राच्या हितासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची." उद्योजक राजेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकात जिराईत भागाचा पाणीप्रश्न आणि साखर उद्योगाचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली.

Bomb Threat In Mumbai : मुंबई पालिका मुख्यालयासह, महाविद्यालये अन् विमानतळाला बॉम्बने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा धमकी

तुमच्या किमयेमुळे छप्पन वर्षे ससदीय कामात असणारा मी एकमेव आहे. पण आताच्या निवडणुकीत लोक बोलत नसल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले. दहशतीचे वातावरण होते की, काय माहिती नाही. पण लोक शांत होते. मतदान केंद्रात गेल्यावर मात्र बटण कोणते दाबायचे, हे त्यांना सांगावे लागले नाही. यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात, जगात बारामतीकर किती समंजस आहेत, हा संदेश गेला." असे पवार म्हणाले.

लोकसभेप्रमाणे विधानसभेला साथ द्या'

'संघर्षाच्या स्थितीमध्ये लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून लोकसभा निवडणुकीत भरघोस मतदान केले. दहा पैकी आठ जागी यश मिळाले. आता लोकांची जबाबदारी संपली, यापुढे आमची जबाबदारी सुरू झाली. देशातील १३० कोटी जनतेला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. यापुढील सर्व निवडणुकीत लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू. राज्यातील सत्ता बदलासाठी सहकार्य करा. ज्या पद्धतीने लोकसभेला मतदान केले, त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत आम्हाला साथ द्या," असे आवाहन शरद पवार यांनी कोहाळे खुर्द येथे शेतकरी जनसंवाद कार्यक्रमात केले

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply