Sharad Pawar : शरद पवारांच्या नावावरच निवडणूक लढवणार, बड्या नेत्याने केले काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या बातम्यांचे खंडन

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पुण्यातील पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बाग येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे काही आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते. माध्यामांमध्ये शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा शक्यतांच्या बातम्या येत असतानाच शरद पवार गटाचे नेते आणि पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, 'बाकी चर्चांना काही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आमचं चिन्ह आणि पक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे', असंही त्यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray : आमदार, खासदार फोडले, पण निष्ठावंत अजूनही माझ्यासोबत... नगरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली!

'आमदार, विद्यमान खासदार, मंत्री आजी-माजी आमदार यांची बैठक शरद पवारांनी आज घेतली होती. या बैठकीत त्यांनी पक्ष चिन्ह आणि नाव यासंदर्भातील केस सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्याविषयी चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत लवकर निर्णय द्यावा अशी आमची मागणी आहे. शरद पवारांचे नेतृत्व राज्याला मान्य आहे, आणि त्याच्यांच नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमचं नाव आणि चिन्ह आम्हाला परत द्यावं. आम्ही आमच्या त्याच चिन्हावर आणि नावावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढू. बाकीच्या चर्चांना काही आधार नाही. कोणत्या पक्षात विलीन होणे, दुसऱ्या पक्षांच्या चिन्हावर लढण्याच्या चर्चांना काही अर्थ नाही, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

'आमचा स्वातंत्र्य बाणा कायम ठेवत येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये जे नाव आणि चिन्ह मिळेल ते घेऊन लोकांसमोर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विलिनीकरणाच्या बातम्या तथ्यहीन आहेत. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. यामुळे आमच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आमचं नाव आणि चिन्ह परत द्यावं, ते न मिळाल्यास आम्ही आमचं नवं नाव आणि चिन्ह घेऊन निवडणुका लढू असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

तर मंगलदास बांदल यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाशी काही संबध नाही. ते आमच्या गटाचे नेते नाहीत असंही प्रशांत जगताप यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply