Sharad Pawar : ते आले, भिजले आणि भाषण दिलं; साताऱ्यानंतर नवी मुंबईतही शरद पवारांची भर पावसात सभा, आता कुणाची विकेट जाणार?

Sharad Pawar :  पाऊस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांचे वेगळंच नातं आहे. असं म्हटलं जातंय की पाऊस हा शरद पवारांसाठी लकी ठरतो. साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेनंतर  निवडणुकीचं चित्र पालटल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. आताही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये एनसीपीच्या महिला बचत गटाच्या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते अन् त्या ठिकाणीही पाऊस बसरला. शरद पवारांनीही भर पावसात सभेला संबोधित केलं. 

साताऱ्यातील सभेची आठवण 

या आधी शरद पवारांनी विधानसभा निवडणूक आणि सातारा पोटनिवडणुकीच्या वेळी साताऱ्यात जाहीर सभा घेतली होती. पवारांच्या सभेच्या वेळी धो-धो पाऊस कोसळत होता. पण पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील हे होते. ते शरद पवारांचे मित्र आणि त्यांच्या राजकारणातील सुरूवातीपासूनचे सोबती. त्यांच्यासाठी शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली आणि संबोधित केलं. 

Varandha Ghat Accident: वरंधा घाटात गाडी पलटी; प्रवाशी थोडक्यात बचावले

शरद पवार पावसात भिजले पण त्यांच्यावर फक्त पावसानेच नव्हे तर मतदारांनीही मतांचा वर्षाव केला आणि उदयनराजेंना पाडून श्रीनिवास पाटील खासदार झाले. त्यामुळे शरद पवारांची ती पावसातील सभा मात्र महाराष्ट्राच्या कायमच लक्षात राहिली. 

आताही  नवी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शरद पवार येताच पाऊस सुरू झाला. समोर मोठा जनसमूदाय असल्याने पवारांनी हा कार्यक्रम रद्द न करता कायम करण्याची सूचना केली. पावसाची स्थिती पाहता पवारांनी थेट मुख्य कार्यक्रमाला सुरूवात केली आणि भर पावसातच कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पाऊस हा शरद पवारांच्यासाठी लकी ठरणारा असल्याचं सांगत साताऱ्याप्रमाणे नवी  मुंबईची जनताही आता शरद पवारांच्या पाठिशी राहणार असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली. 

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

अनेक वर्षांनंतर शरद पवार कल्याणमध्ये आल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह दिसून आला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्या निवासस्थानी शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रिपुल येथे  जेसीबीने शरद पवार यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर शरद पवार जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्या निवासस्थानी गेले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply