Sharad Mohol Case Update : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Sharad Mohol Case Update : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड गणेश मारणेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. संगमनेर येथून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना बघून त्यांना पळ काढला होता. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलं आणि बेड्या ठोकल्या.

त्याच्यासोबत इतर तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड गणेश मारणेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर येथून ओला-उबेर गाडीतून जात असताना ताब्यात घेतलं आहे.

Shivshahi Bus Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस 'वे'वर शिवशाही बसला अपघात, अलिबागहून स्वारगेटला जात होती बस

दरम्यान, याआधी गणेश मारणेने अटकपुर्व जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळला होता. मारणे याला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. यानंतरही तो गेले अनेक दिवस तो फरार होता. मात्र आज तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

दरम्यान, शरद मोहोळ हत्या प्रकरणात आत्तापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता याप्रकरणातील मारणे आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते. मारणे याला अटक झाल्याने याप्रकरणी तपास आणखी वेगाने पुढे वाढले. तसेच याप्रकरणी नवीन माहिती समोर येऊ शकते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply