Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात अभिजित मानकरला अटक, पोलिसांनी शोधल्या १८ हजार ऑडिओ क्लिप

Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच पोलीस चौकशीत आतापर्यंतची मोठी माहिती समोर आलीय. शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला मंगळवारी पोलिसांनी अटक केलीय. 

सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद

शरद मोहोळ खून प्रकरणी पोलिसांच्या हाती १८ हजार ऑडिओ क्लिप लागल्या आहेत. या सर्व ऑडिओ क्लिप आरोपींच्या मोबाईलमधून सापडल्या आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल १८ हजार ८२७ ऑडिओ क्लिपपैकी  १० हजार ५०० ऑडिओ क्लिप तपासल्या आहेत. त्यामध्ये सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Pune Crime News : 'पोलिसांची काम करण्याची पद्धत माहितीये ना कशीये?', ACP सुनील तांबेंचा गुन्हेगारांना सज्जड दम

अभिजित मानकरला अटक

तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचं नाव समोर आलं होतं. त्यामुळं पोलिसांनी त्याला अटक केलीय. कोथरुड परिसरात ५ जानेवारी रोजी शरद मोहोळचा साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे देखील पोलिसांच्या  ताब्यात आहे.

शरद मोहोळ  हत्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आलीय. यानंतर आता याप्रकरणातील अभिजीत मानकर, गणेश मारणे आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. शेलार आणि मारणे यांनी मोहोळच्या खूनापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं होतं. मारणे याला अटक झाल्यानं तपास आणखी वेगाने होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply