Sharad Mohol Case : पुणे पोलीसांचा दणका! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीची त्याच्याच भागात काढली धिंड

पुणे: पुणे शहरात तीघांनी भरदीवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या प्रकरणात अनेकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड गुंड विठ्ठल शेलार आणि मुन्ना पोळेकर हे असल्याचे पोलीसांच्या तपासत समोर आले आहे.

तसेच या प्रकरणातील संशयित मास्टरमाइंड गणेश मारणे फरार असून, गुन्हे शाखेच्या पथकांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान पुणे पोलीसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड विठ्ठल शेलाराची पोलिसांनी धिंड काढल्याची प्रकार समोर आला आहे. 

पुणे गुन्हे शाखेने गुंड विठ्ठल शेलारची त्याच्याच भागात धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस शेलारला बेड्या घालून रस्त्यावरून घेऊन जाताना दिसत आहेत. गुंड विठ्ठल शेलार शरद मोहोळ हत्या प्रकरणी पुणे पोलिसाच्या ताब्यात आहे, शेलार वर अनेक गुन्हे दाखल आहेत.

मोहोळची भररस्त्यात हत्या केल्यानंतर पुणेकरांच्या मनात आरोपी शेलार याच्याविषयी दहशत पसरली होती. हीच दहशत कमी करण्यासाठी पोलीसांनी शेलार याची भररस्त्यावरून धिंड काढल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेने आत्तापर्यंत विठ्ठल महादेव शेलार आणि रामदास ऊर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (दोघे रा. मुळशी) यांच्यासह १५ जणांना अटक केली आहे. याशिवाय आणखी नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

पोलीस तरपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांनी शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचला होता. तसेच मोहोळचा खून होण्यापूर्वी दोघांची बैठक देखील झाली होती. शेलार याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार याच्यासह सहा संशयितांना पनवेल परिसरातून ताब्यात घेतले होते. कोथरूड परिसरात पाच जानेवारीला दुपारी शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

या प्रकरणी गुन्हे शाखेने त्याचदिवशी रात्री साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांच्यासह दोन वकिलांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply