Shahapur Police : आसनगावजवळ ६ किलो गांजा जप्त; शहापूर पोलिसांकडून एकजण ताब्यात

 

Shahapur : गांजा वाहतूक व विक्री करण्यास मनाई आहे. मात्र अवैधपणे गांजाची तस्करी करण्यात येत असते. अशाच प्रकारे गांजाची तस्करी होत असल्याची माहिती वासिंद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आहे. या कारवाईत ६ किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका जणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव जवळ मुंबई- नाशिक महामार्गावर एक व्यक्ती गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती वाशिंद स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक आसनगाव जवळ थांबून येणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्षा करत होते. याच दरम्यान एकजण शेऱ्याचापाडा येथील फाट्याजवळ येऊन उभा राहिला.

Maharashtra Politics : 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?

सव्वा लाखाचा गांजा जप्त

वासिंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई- नाशिक आग्रा महामार्गावरील शेऱ्याचापाडा येथील फाट्या जवळील एका हॉटेल जवळून जाणाऱ्या सुहास चंदन (वय ४२, रा.आसनगाव} याच्यावर पोलिसांना संशय आला. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याजवळ ६ किलो गांजा मिळून आला. त्या गांजाची अंदाजे किंमत १ लाख २० हजार इतकी आहे.

 

शहापूर पोलिसात गुन्हा दाखल

गांजा घेऊन जाणाऱ्या एका जणाला शहापूर याप्रकरणी शहापुर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकांत शिंदे, सुनील कदम, पोलीस हवालदार प्रकाश साहिल, संतोष सुर्वे व स्वप्नील बोडके यांनी सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी आता पुढील चौकशी सुरु आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply