Seizes Foreign Cigarettes : मुंबईमधून १० कोटींहून अधिक किंमतीचा परदेशी सिगारेटचा साठा जप्त

Seizes Foreign Cigarettes : महसूल गुप्तचर संचालनालयाने उरण येथील न्हावाशेवा बंदरात असलेल्या एका कंटेनरमधून १० कोटी ८० लाख रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे. सागरी मार्गाने ही तस्करी सुरू होती. मात्र याची माहिती मिळताच डीआरआयने मालवाहू कंटेनरवर धाड टाकली. यात चायनीज व्हिस्कोस कार्पेट असल्याचे सांगत यातून दुबईहून आणलेल्या विदेशी सिगारेटची तस्करी केली जात होती. मात्र गुप्तचर विभाला याची माहिती मिळताच त्यांनी हा डाव हाणून पाडला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डीआरआयने ही कारवाई नेमकी केव्हा केली त्याची तारीख स्पष्ट केलेली नाही. महसूल गुप्तचर संचालनालयाने न्हावाशेवा बंदरात दोन कंटेनरची तपासणी केली होती. यात परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये जवळपास ६७ लाख २० हजार सिगारेट जप्त करण्यता आल्या आहेत. त्यांची किंमत १० कोटी ८० लाख रुपये आहे.

Raj Thackeray : गावं संपलीत, पायाखालच्या जमिनी निघून जाताहेत; भूमिपुत्रांना सावध करताना राज ठाकरे यांनी बोट दाखवले नेमके कुणाकडे?

दुबईच्या जेबेल अली बंदरावरून सिगारेटचा साठा न्हावाशेवा बंदरात पाठवण्यात आला होता. यामध्ये कोरियामध्ये तयार केलेल्या सिगारेटचाही समावेश आहे. डीआरआयने सुरुवातीला पहिल्या कंटेनरची तपासणी केली, तेव्हा यात Esse चेंज - कोरियामध्ये बनवलेल्या सिगारेट सापडल्या. त्यानंतर दुसऱ्या कंटेनमध्ये तपासणी केली तेथेही परदेशी सिगारेटचा साठा सापडला. या सिगारेट्स मूळ उत्पादक देशातून प्रथम UAE मधून मुंबईत नेल्या गेल्याचा एजन्सीला संशय आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply