Sea Waves : मुंबईत यंदा पावसाळ्यात २५ दिवस धोक्याचे; समुद्रात उसळणार लाटा

मुंबई - पावसाळ्यासाठी मुंबई महा पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला उधाण येणार असून २५ दिवस धोक्याचे असणार आहेत. या दरम्यान मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असल्याने पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफसह इतर यंत्रणाही तैनात केल्या जाणार आहेत.

पावसाळ्यात सुरुवातीला म्हणजे ४ ते ८ जून रोजी सलग पाच दिवस हायटाईड असणार आहे. या दरम्यान समुद्रात ४.५१ ते ४.६९ मीटर उंच लाटा उसळतील. आणि जुलैमध्येही सहा दिवस समुद्रात हायटाइड असणार असून ४.७७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. जुलै महिना पावसाचा असतो. याचवेळी पाऊस कोसळल्यास सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता असते. त्यामुळे यावेळची स्थिती आव्हानात्मक असेल.

याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग सहा दिवस आणि महिना अखेरला ३० व ३१ ऑगस्टला ८ दिवस हायटाईड असेल. यावेळी ४.८७ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीचे तीन व महिन्या अखेरेला तीन दिवस असे सहा दिवस समुद्रात लाटा उसळणार असल्याने सखलभागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

भरतीचे दिवस

दिनांक - वेळ - लाटांची उंची

४ जून - १२.१६ वा. - ४.६२ मिमी

५ जून - १३. ०१ वा. - ४.६९ मिमी

६ जून - १३.४७ वा. - ४.६९ मिमी

७ जून - १४.३५ वा - ४.६४ मिमी

८ जून - १५.२५ वा - ४.५१ मिमी

३ जुलै - १२.२ वा. - ४.६० मिमी

४ जुलै - १२.४९ वा. - ४..७२ मिमी

५ जुलै - १२.३६ वा. - ४.७८ मिमी

६ जुलै - १२.२३ वा. - ४.७७ मिमी

७ जुलै - १२.१० वा. - ४.६९ मिमी

८ जुलै - १२.५५ वा. - ४.५२ मिमी

१ ऑगस्ट - ११.४६ वा. - ४.५८ मिमी

२ ऑगस्ट - १२.३० वा. - ४.७६ मिमी

३ ऑगस्ट - १३.१४ वा. - ४.८७ मिमी

४ ऑगस्ट - १३.५६ वा. - ४.८७ मिमी

५ ऑगस्ट - १४.३८ वा - ४.८७ मिमी

६ ऑगस्ट - १५.२० वा.- ४.५१ मिमी

३० ऑगस्ट - ११.२६ वा. - ४.५९ मिमी

३१ ऑगस्ट - १२.०६ वा. - ४.८० मिमी

१ सप्टेंबर - १२.४४ वा. - ४.८८ मिमी

२ सप्टेंबर - १३.२२ वा. - ४.८४ मिमी

३ सप्टेंबर - १.५२ वा. - ४.६४ मिमी

२८ सप्टेंबर - ११.वा. - ४.५६ मिमि

२९ सप्टेंबर - ११.३७ वा. - ४.७१ मिमि

३० सप्टेंबर - ८ वा - ४.७४ मिमी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply