Sayaji Shinde : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं बोलणं आमच्यासमोर झालेलं! सयाजी शिंदेंचं मोठं विधान

अभिनेते सयाजी शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी त्यांच्यासमोर चर्चा झाली होती. शिंदेंनी असेही सांगितले की, दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात, हे अजित पवारांचे स्वप्न होते. सयाजी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

शिंदेंनी नुकतीच सहयोग सोसायटीत जाऊन अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, जर दोन्ही पवार कुटुंबे एकत्र येऊन काम करतील, तर महाराष्ट्रासाठी ते चांगले राहील आणि राज्याची ताकद वाढेल. अजित पवारांचे हे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, असे शिंदेंनी मत व्यक्त केले. मात्र, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी, विशेषतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी, एकत्रीकरणाच्या चर्चांना फारसे अनुकूलता दाखवली नाही. विलिनीकरणाचा विषय साहेबांच्या अखत्यारित आहे, असेही एका नेत्याने नमूद केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *