Saudi Bus Accident : काळाचा घाला! मक्केहून मदिनाकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; ४२ भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू

New Delhi : सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीयांवर काळाने घाला घातला आहे. मक्काहून मदीनाकडे जाताना भारतीय प्रवाशांच्या बसला एका डीझेल टँकरने जोरात धडक दिली. मध्यरात्री दीड वाजता टँकर अन् बसची जोरात धकड झाली. बसमधील सर्वजण झोपेत असतानाच काळाने घाला घातला अन् क्षणात परिसरात हाहाकार उडाला. बसमधील ४२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या किंकाळ्याने परिसर हादरून गेला होता. मृतामधील भाविक हे हैदराबादमधील जास्त असल्याचे समजतेय.

मक्काहून मदीना निघाले, वेळ रात्री दीड वाजता. बसमधील महिला, मुले अन् इतर सर्वजण झोपेत होते. पण त्याचवेळी मुहरासजवळ डिझेल टँकरने जोरात धडक दिली अन् दोन्ही वाहनाने पेट घेतला. पाहता पाहता बसचे रूपांतर आगीच्या गोळ्यात झाले. आतमध्ये असणारे बाहेर येण्यासाठी आरडाओरडा करत होते. परिसर किंकाळ्यांनी हादरून गेला होता. लहान मुले, महिलांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गेले होते, पण काळाने घाला घातला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले.

Pune Traffic : पुढील 6 दिवस मोठे बदल; शहरातील या भागात वाहतूक वळवणार, पर्यायी मार्ग जाहीर

पण आग इतकी भयंकर होती की दुर्दैवी घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये २० महिला आणि ११ मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेतून फक्त एक प्रवासी वाचलाय. त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बसला आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आग विझवताना अग्निशामन दलाचे कर्मचारी दिसत आहेत. आग इतकी प्रचंड आहे की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन ते चार तास लागल्याचे सांगण्यात येत आहे.

तेलंगाना सरकार रियादमधील भारतीय दूतावासाच्या संप्रकात आहे. भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. दूतावासकडून सांगण्यात आले की, "सौदी अरेबियाच्या मदीनाजवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. जेद्दामध्ये भारतीयांसाठी 24x7 कंट्रोल रूम केले आहे. 8002440003 या क्रमांकावर कधीही संपर्क करू शकता" दरम्यान, तेलंगणा सरकारकडूनही हैदराबाद आणि राज्यातील प्रवाशांच्या कुटुंबासाठी 79979-59754 आणि 99129-19545 क्रमांक जारी केले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *