Satyajeet Tambe : माझ्या कुटूंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं...अखेर सत्यजीत बोलले

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातून मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. अशातच त्यांनी सध्याच्या घडामोडीवर मोठं विधान केलं आहे.खूप राजकारण झालं, त्यावर योग्यवेळीच बोलू असा इशारा तांबे यांनी दिला आहे.

शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यापार्श्वभूमीवर बोलताना तांबे यांनी मनातील सल बोलून दाखवली आहे.मी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे सर्व शिक्षक, पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्यावेळी आमच्या संपूर्ण परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं, तेव्हा कपिल पाटलांनी आम्हाला स्वतः फोन करून पाठिंबा दिला.

अशा काळात कपिल पाटील आणि शिक्षक भारती आमच्या मदतीला धावून आली. हे मी कदापि विसरू शकणार नाही.तसेच, खरंतर कपिल पाटील माझ्यासाठी विधानसभा मतदारसंघ शोधत होते. आमची अनेकवेळा चर्चा व्हायची. ते म्हणायचे तू या मतदारसंघातून उभं राहण्याचा प्रयत्न कर, तू तिथून उभं राहण्याचा प्रयत्न कर. परंतू राजकारण असतं. ते किती असतं हे सर्वांनी मागील चार-पाच दिवसात टीव्हीवर पाहिलंच आहे.खूप राजकारण झालं आहे. आम्ही त्यावर योग्यवेळी योग्यरितीने बोलूच. सध्या मी राजकारणावर बोलणार नाही. असा इशाराही तांबे यांनी यावेळी दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply