Satellite Toll System : सॅटेलाइट बेस्ड टोल सिस्टम काय आहे? हायवेवरून टोल प्लाझा होणार गायब, जाणून घ्या

Satellite Toll System : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. यानुसार टोल प्लाझा वर लागणारा वेळ कमी करण्यासाठी फास्टॅग एवजी नवीन सर्व्हीस आणली जाणार आहे. या सॅटेलाइट बेस्ड सर्व्हिसमुळे तुमचा टोल प्लाझावर खूप वेळ वाचणार आहे.

नितीन गडकरी यांचा दावा आहे की ही सर्व्हिस फास्टॅगपेक्षा फास्ट असेल. मात्र अद्याप ही कधीपर्यंत लाँच केली जाईल याबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये. ही सॅटेलाइट बेस्ट टोल सिस्टम नेमकं काय असते याबद्दल आपण जाणून घेऊया.

सरकार याच्या माध्यमातून सर्व फिजिकल टोल काढून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामुळे एक्सप्रेसवेवर लोकांना रांगेत लागावे लागू नये. सरकार जीएनएसएस बेस्ड टोलिंग सिस्टमचा वापर सुरू करेल. जे सध्याच्या इलेक्ट्रॉनिक टोल सिस्टमला रिप्लेस करेल.

सध्याचं सीस्टम आरएफआयडी टॅग्सवर काम करते, जे ऑटोमॅटीक टोल कलेक्ट करते. तर दुसरीकजे जीएनएसएस बेस्ट टोलिंग सिस्टममध्ये व्हर्चुअल टोल असतील. म्हणजेच टोल तुम्हाला दिसणार नाहीत. यासाठी व्हर्च्युअल गॅट्रींज इंस्टॉल केले जातील जे जीएनएसएस इनेबल व्हेकलशी कनेक्ट असतील आणि टोल टॅक्स कापला जाईल.

Lok Sabha Election : जालन्यातून जरांगे पाटलांनीच निवडणूक लढावी; मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

एखादी कार व्हर्चुअल टोलमधून गेली की यूजरच्या अकाउंटमधून पैसे कापले जातील. भारताकडे आपली नेव्हिगेशन सिस्टम GAGAN आणि NavIc आहे. यांच्या मदतीने वाहनांना ट्रॅक करणे सहज शक्य होईल, सोबतच यूजर्सचा डेटा देखील सुरक्षित राहील. मात्र या योजनेपुढे काही आव्हाने आहेत. जर्मनी, रशिया आणि अनेक दुसऱ्या देशांमध्ये ही सर्व्हिस सुरू आहे.

फायदा काय होणार?

या सीस्टममुळे तुमचा प्रवास कुठल्याही अडचणीशिवाय होईल. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही टोलवर थांबावे लागणार नाही. यामध्ये फास्टॅगपेक्षा कमी वेळ लागतो, याला देखील काही प्रमाणात वेळ लागतो. तसेच इफ्रास्ट्रक्चर काँस्ट देखील कमी असणार आहे. तसेच यूजर्स एक्सपीरियंन्स देखील चांगला होणार आहे.

मात्र या सिस्टमनंतर प्रायव्हसी एक महत्वाचा मुद्दा असणार आहे. ही सॅटेलाइट बेस्ड सर्व्हिस असल्याने यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. लोकांमध्ये याबद्दल जागरुकता पसरवणे हे देखील मोठं चॅलेंज असणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply