Satara Rain Update : साता-यात पावसाची संततधार, पाटणला दरड काेसळली; उद्या रेड अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

Satara News : भारतीय हवामान विभागाने  सातारा जिल्ह्याला रेट अलर्टचा इशारा दिला आहे. यामुळे उद्या पावसाचा जाेर वाढण्याची शक्यता असल्याने ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो. त्या गावांमधील नागरिकांना पुर्व सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करावी असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी  यांनी महसूल विभागास दिले आहेत.

सातारा जिल्ह्यात आज (मंगळवार) पावसाचा कमी प्रमाणात आहे. आज पाटण तालुक्यातील टोळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली. या परिसरात आणखी दरड कोसळण्याचा धोका असल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. दरम्यान टोळेवाडीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता असल्याची माहिती पीडब्ल्यूडीने दिली.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने उद्या सातारा जिल्हयात रेड अलर्ट घोषीत केला आहे. भारतीय हवामान विभागाकडून सातारा जिल्हयाला ज्या-ज्या वेळी रेड अलर्ट अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा देण्यात येईल अशावेळी पश्चिमेकडील तालुक्यातील विशेषत: पाटण, महाबळेश्वर , वाई , जावली व सातारा या तालुक्यामध्ये तसेच उर्वरित तालुक्यामधील ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो.

Mithi River News : मिठी नदीच्या गाळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

अशा गावांमधील नागरिकांना पूर्व सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची राहिल असा आदेश जिल्हाधिकारी डूडी यांना काढला आहे.

जे अधिकारी अथवा कर्मचारी हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कठोर कारवाई करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply