Satara News: साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन! छत्रपती उदयनराजे शिवेंद्रराजेंच्या भेटीला, दिलगिरीही व्यक्त केली; नेमकं काय घडलं?

Satara News : सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाजपकडून उद्याप उदयनराजेंच्या नावांची घोषणा झाली नसली तरी निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच आज छत्रपती उदयनराजे यांनी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दोन्ही राजेंची भेट!

साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यामधील शितयुद्ध प्रसिद्ध आहे. मात्र लोकसभा निवडणुकीआधी दोन्ही राजे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस असल्याने उदयनराजे भोसले यांनी त्यांची सुरूची बंगल्यावर भेट घेत जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Dhule Crime News : अफूची पुष्पा स्टाईल वाहतूक, दोघांना अटक; शिरपूर पोलिसांची कारवाई

उदयनराजेंच्या हटके शुभेच्छा!

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना  खास स्टाईलमध्ये गालावर पप्पी देत वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या. तसेच माझं कधी काही चुकलं‌ असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे यांच्या दिलजमाईसाठी प्रयत्नही केल्याचे पाहायला मिळाले.

लोकसभेच्या तोंडावर मनोमिलन?

छत्रपती उदयनराजे यांच्या भेटीनंतर राजेंना भारतीय जनता पक्षाने  लवकरात लवकर उमेदवारी द्यावी, आम्ही प्रचार करण्यासाठी तयार आहोत, अशी इच्छा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली. दरम्यान, साताऱ्याच्या राजकारणात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचा संघर्ष जुना आहे. त्यामुळेच ऐन लोकसभेच्या तोंडावर दोन्ही राजेंमध्ये झालेल्या झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply