Satara News : दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Satara News : पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित आठ गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून १६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून बाधितांना उत्कृष्ट दर्जाची घरे देण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

मोरगिरी, ता. पाटण येथे दरडग्रस्त कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

Mumbai Fire News : घाटकोपरच्या सागर बोनान्झा मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; २५ ते ३० दुकानांचा जळून कोळसा, एकजण जखमी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक घटक सुखी-समाधानी रहावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून सर्व आपत्तीच्या प्रसंगी पाठीशी राहणारे सरकार आहे. संकटकाळात नेहमीच शासनाने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे दरडग्रस्त कुटुंबांना सर्व सुविधायुक्त घरे देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या दीड वर्षात शासनाने सर्व सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. राज्यात अनेक विकासाचे प्रकल्प सध्या सुरु असून शासनाने महिला सक्षमीकरणासाठी महिला धोरण जाहीर केले असून लेक लाडकी योजना, एसटी मध्ये ५० टक्के सवलत, महिला बचत गटांच्या खेळत्या भांडवलात वाढ दिल्याचे सांगून त्यांच्या उत्पादनांना विक्रीसाठी संधी उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.  

ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार उपक्रमामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १० टीएमसीने वाढ होईल. सातारा जिल्ह्यात अनेक सोयी-सुविधा, प्रकल्प सुरु असून २२५ मॉडेल स्कुल, ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. मुनावळे प्रमाणेच पाटणमध्ये करण्यात येणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे सांगून शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनाला चालना दिल्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटनाला चालना देण्यासाठी ४२६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून सर्व प्रकल्प पूर्ण करावेत, असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply