Satara News : धनगर आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यात बंदची हाक; बहुतांश गावात कडकडीत बंद

Satara News : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात बेमुदत उपोषण सुरु आहे. सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे समाजातंफ्रे आज खंडाळा तालुका बंदची हाक दिली होती. खंडाळा तालुका बंदला खंडाळावासीयांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला असून अनेक गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.

मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीनंतर  धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मोर्चा, उपोषण करत एसटी प्रवर्गात समजलं आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. लोणंद येथील नगरपंचायत पटांगणावर धनगर समाज एस.टी आरक्षण शिफारशी करिता गेल्या बारा दिवसापासून गणेश केसकर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेत नसल्यान धनगर समाजाने  खंडाळा तालुका बंदची हाक दिली दिली होती.

MLA Ravindra Dhangekar ON Lalit Patil Drug Case : ललित पाटील क्राईम ब्रँच अधिकाऱ्याच्या संपर्कात, व्हिडीओ कॉल करायचा; रविंद्र धंगेकरांचा दावा

गावांमध्ये शुकशुकाट 

समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. आज बाराव्या दिवशीही गणेश केसकर यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. दरम्यान आज सकाळपासूनच खंडाळा तालुक्यातील बहुतांश गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे गावांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply