Satara Crime : पोलिस पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी; अमित भोसले हत्याकांडाचा १० दिवसानंतर छडा

Satara Crime : सातारा महामार्गावरील वाढेगाव परिसरात एका व्यावसायिकाची अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडाचा छडा पोलिसांनी लावला असून पोलीस पत्नीनेच आपल्या व्यावसायिक पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह ५ जणांना अटक केली आहे. 

२४ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरालगत असलेल्या वाढे फाटा येथे वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांनी एकूण ६ गोळ्या भोसले यांच्यावर झाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला होता. हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले होते.

दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार करून संशयितांचा मागोवा घेणे सुरू केले होते.ज्या ठिकाणी या व्यावसायिकाची हत्या झाली तेथे खूप अंधार असल्याने पोलिसांना कोणताही सबळ पुरावा हाती लागत नव्हता.

मात्र पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी पोलीस दलातील अत्यंत चतुर पोलिसांची हाती हे प्रकरण सोपवलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या शोधात राज्यातील तब्बल ७ जिल्हे पालथी घातली. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply