Satara Constituency : चर्चा तर हाेणारच! बारामतीच्या चव्हाणांचा सातारा लाेकसभा मतदारसंघात अर्ज दाखल, बिचुकलेंनी ठाेकला शड्डू

Satara Constituency : सातारा लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी बारामती येथील एकाने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान या मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले , आमदार शशिकांत शिंदे , अभिनेते डाॅ. अभिजीत बिचुकले  यांच्यासह एकूण 30 जणांनी 55 अर्ज नेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सा-या राज्याचे लक्ष सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. या मतदारसंघात भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले  हे महायुतीकडून निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत. अद्याप उदयनराजेंच्या अधिकृत उमेदवारीबाबत शिक्कामाेर्तब झालेला नाही. दूसरीकडे त्यांनी निवडणुक लढविण्यासाठी प्रशासनाकडून अर्ज घेतला आहे.

Lok Sabha Election : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात महायुतीपुढे मोठा पेच; रविंद्र वायकरांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध

महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आमदार शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी सातारा ते कराड अशी रॅली काढत त्यांच्या प्रचारास प्रारंभ केला.

बारामतीतून सातारा लाेकसभा मतदारसंघात अर्ज दाखल

याबराेबरच नेहमीच वेगवेळ्या निवडणुकीत लढणारे अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सातारा लाेकसभा मतदारसंघात एकूण 30 जणांनी 55 अर्ज नेले आहेत. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे राहुल गजानन चव्हाण (रा. वानेवडी ता.बारामती) यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply